जळगाव-प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपर्क से समर्थन या उपक्रमाच्या अंतर्गत जळगावकरांशी संवाद साधला. याप्रसंगी लोकांनी वार्तालाप करतांना भाजपला एकमुखाने पाठींबा दिल्याचे दिसून आले.
ाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात बुधवार २९ रोजी शहरातील घाणेकर चौकातून घर चलो अभियानाला उत्साहात सुरुवात झाली. आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षांनी यावेळी नागरिकांशी संपर्क साधला.
या संवादात विविध समाज मंडळे तसेच संस्थांनी भारतीय जनता पक्षाला पाठींबा व्यक्त केला. यात केंद्र व राज्य सरकारचा कारभार, जनहिताच्या योजना आदींचा सर्वसामान्यांना लाभ झाला असून देश प्रगतीपथावर असल्याचे अनेकांनी आवर्जून नमूद केले.

Leave a Reply