
रांची-वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी क्रांतीकारी आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांना माल्यार्पणासह अभिवादन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची येथे आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली. मोदींनी जुन्या मध्यवर्ती कारागृहातील भगवान बिरसा मुंडा स्मारक तसेच स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयात बिरसा मुंडा यांच्या २५ फूट उंच पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
जननायक बिरसा मुंडा यांनी ९ जून १९०० रोजी येथे अखेरचा श्वास घेतला. बिरसा मुंडा यांची जयंती देशभरात आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. मोदींनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली. यात त्यांनी आपण भगवान बिरसा मुंडा जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करतांना आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply