मुंबई-प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कथित व्हायरल फोटो प्रकरणी मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टिका केली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोमधील फोटो ट्विट केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून याला भाजप नेत्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांनी राऊत यांना खरे मर्द असाल तर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ शेअर करण्याचे आव्हान दिले आहे.
या संदर्भात कंबोज म्हणाले की, मी महाराष्ट्राचे पोपट मियॉं सलीम यांना खुले आव्हान देत आहे आहे. राऊत यांनी आपल्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे २७ फोटो व ३ व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे. राऊत खरे मर्द असतील तर त्यांनी बावनकुळे यांचा यापुढे १ फोटो किंवा व्हिडिओ टाकून दाखवावा, असे मोहित कंबोज यांनी एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे.

Leave a Reply