आ. मंगेशदादा चव्हाण लंडन अभ्यास दौर्‍यासाठी रवाना

चाळीसगाव-प्रतिनिधी | चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण रविवार, 19 रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सकाळच्या विमानाने लंडन रवाना झाले.

यावर्षी लंडन येथील जगप्रसिद्ध वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड निमंत्रणावरून महाराष्ट्रातील 12 आमदारांचे शिष्टमंडळ सोमवार, 20 ते 25 नोव्हेंबर 2023 दरम्यान ब्रिटन (युके) येथे अभ्यास दौर्‍यावर जाणार आहे. यात चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचीदेखील निवड झाली असून ते रविवार, 19 रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सकाळच्या विमानाने लंडन रवाना झाले.

या अभ्यास दौर्‍याच्या निमित्ताने वेल्स, यूके येथील विद्यापीठात सुशासन आणि सार्वजनिक धोरण या विषयावरील कार्यकारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वेल्समधील णथढडऊ च्या लॅम्पीटर कॅम्पसमध्ये, विविध सांस्कृतिक भेटींबरोबरच सुशासन आणि सार्वजनिक धोरण या विषयांवर आणि आसपासच्या अनेक दिवसांच्या कार्यशाळांचा भाग आमदार असतील. या कार्यक्रमात कार्डिफमधील सेनेड असेंब्लीला आणि वेस्टमिन्स्टर येथील संसदेच्या सभागृहांना भेट देणे देखील समाविष्ट आहे. कार्यक्रमाची समाप्ती व्हाईटहॉलमधील नॅशनल लिबरल क्लबमध्ये औपचारिक डिनरद्वारे केली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा वध केला होता ती वाघनखे ठेवण्यात आलेल्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला आमदारांचे शिष्टमंडळ भेट देणार असून आपल्या महाराष्ट्राच्या एका दैदिप्यमान अश्या इतिहासाची खून असणार्‍या शिवरायांच्या वाघनखांचे दर्शन यानिमित्ताने होईल, यासोबतच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थानाचे भव्य स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे, सदर स्मारकाला तसेच लंडन येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला देखील आमदारांचे शिष्टमंडळ अभिवादन करणार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*