गिरीशभाऊंवर अनाठायी टिका कशासाठी ? : खा. उन्मेष पाटील

जळगाव- प्रतिनिधी | एकनाथ खडसे यांनी खुनशी राजकारण केले, सातत्याने मी पणा केल्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली अशी जोरदार टिका जळगावचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.

सध्या ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी खालच्या स्तरावर टिका केल्याने भाजपमधून जोरदार प्रतिक्रिया उमटली आहे. ठिकठिकाणी भाजपच्या वतीने खडसेंचा निषेध करण्यात येत आहे. या अनुषंगाने, जळगावात आयोजीत पत्रकार परिषदेत खासदार उन्मेषदादा पाटील यांनी देखील खडसेंवर घणाघाती टिका केली.

ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांचे अहंकारामुळे पतन झाले आहे. त्यांनी भाजपमध्ये असतांना देखील आकसाचे राजकारण केले. आणि आता ते गिरीशभाऊंसारख्या मोठ्या नेत्यावर अनाठायी टिका करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*