
भडगाव-प्रतिनिधी | चाळीसगाव तालुक्यातील प्रवीण मराठे यांनी सर्वाधीक सरल ॲप डाऊनलोड केल्यानिमित्त त्यांचा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
चाळीसगाव शहरात मोफत २१०७ लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड (गोल्डन कार्ड) त्यासोबतच केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येणार्या सर्व योजनेची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने बनविलेले सरल ॲप २१०७ लाभार्थ्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून दिल्याबद्दल प्रविण शिवाजीराव मराठे यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सन्मान करून विशेष कौतुक केले. भडगाव येथील बावनकुळे यांच्या दौर्यात हा सत्कार पार पडला.
चाळीसगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टी तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे कट्टर समर्थक प्रविण शिवाजीराव मराठे यांनी मोफत २१०७ लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड (गोल्डन कार्ड) सोबतच सर्वाधिक २१०७ सरला बनवून तालुक्यात पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरल ॲप बद्दल माहिती देताना सांगितले की, प्रत्येकाने हे डाऊनलोड केल्यापासून दररोज यावरील माहिती वाचून जनसामान्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. तसेच केंद्र शासनाच्या नवनवीन योजना सर्व घटकांना उपयुक्त योजने संदर्भात परिपूर्ण माहिती भारतीय जनता पार्टी पक्षाकडून समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काढलेला हा ॲप असून सर्वांनी तो डाऊनलोड करून दररोज वापरावा व त्याहून आलेली माहिती ही आपण इतरांना सुद्धा शेअर करावी असे सांगितले.
यावेळी खासदार उन्मेषदादा पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील (जळकेकर); चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण, चाळीसगाव तालुका निवडणूक प्रमुख घृष्णेश्वर पाटील (तात्या) तालुका अध्यक्ष सुनील निकम सर, शहराध्यक्ष नितीन पाटील यांनी सुद्धा प्रविण शिवाजीराव मराठे यांच्या कामाचे कौतुक करून अभिनंदन केले.
Leave a Reply