देवेंद्रजींनी भर पावसात शहिदांना अर्पण केली श्रध्दांजली !

मुंबई-प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भर पावसात २६/११ हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण केली

मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अमृता फडणवीस यांच्या पुढाकाराने ग्लोबल पीस ऑनर्सने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेटवे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. यावेळी 26/11तील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. फडणवीस भाषण करत असतानाच अचानक वरुणराजाने हजेरी लावली. भर पावसातही देवेंद्र फडणवीस यांनी आपलं भाषण थांबवलं नाही. फडणवीस यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. सर्वच मान्यवर या भर पावसात उभे होते. यावेळी श्री श्री रविशंकर यांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री श्री रविशंकर यांचा सत्कार करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*