कॉंग्रेसकडून गुर्जरांचा अपमान! : पंतप्रधान कडाडले

जयपूर-वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसला धारेवर धरतांना त्यांनी गुर्जर समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजसमंद येथे प्रचार सभेत राजस्थान विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादाचा संदर्भ उपस्थित करत कॉंग्रेसमध्ये सचिन पायलट यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात मोदीजी म्हणाले की, ‘‘एक गुर्जरपुत्र राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करतो, त्याचे आयुष्य पक्षाला देतो आणि सत्तेवर आल्यावर राजघराणे त्याला दुधातून माशीप्रमाणे बाहेर काढते. त्यांनी राजेश पायलट यांनाही हीच वागणूक दिली होती आणि त्यांच्या मुलालाही तसेच वागवत आहेत.’’

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आदल्या दिवशी देखील अशाच प्रकारची टीका केली होती. यानंतर त्यांनी पुन्हा सचिन पायलट यांच्यावरील अन्यायालया प्रचार सभेत पुन्हा महत्वाचे स्थान दिल्याचे दिसून आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*