भुसावळात एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला ‘चप्पल मार’ आंदोलन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील नाहाटा चौफुलीवर ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या विरोधात अपशब्द वापरणारे आमदार एकनाथ खडसे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाप्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर, याप्रसंगी खडसे यांच्या प्रतिमेला चपला मारून निषेध करण्यात आला. या आंदोलनात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, रमाशंकर दुबे, अनिरूध्द कुलकर्णी, पवन बुंदेले, रवी ढगे, संदीप सुरवाडे, प्रवीण इखनकर, शंकर शेळके, चेतन सावकारे, धनराज बाविस्कर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*