
नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रविावारी आकाशवाणीवरील ’मन की बात’ कार्यक्रमाच्या १०७ व्या भागात संबोधित करणार असून यात ते नेमके कोणत्या मुद्यांना स्पर्श करणार ? याबाबत उत्सुकता लागली आहे.
पंतप्रधान मोदी आपली मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातील लोकांशी शेअर करणार आहेत. महिन्याच्या शेवटच्या रविवारी ते सकाळी ११ वाजता ऑल इंडिया रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात लोकांशी आपले विचार मांडतील. मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा १०७ वा भाग असणार आहे.
पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या सर्व नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तसेच हा प्रोग्रॅम ऑल इंडिया रेडिओ, वेबसाइट आणि बातम्यांवर आकाशवाणी मोबाइल ऍपवर देखील उपलब्ध असेल. मन की बात कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन बातम्या, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील थेट प्रसारित केला जाईल.
‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रसारित झाला होता. पीएम मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी या कार्यक्रमाला संबोधित करतात. हा मासिक रेडिओ कार्यक्रम आहे. यातील प्रत्येक भागात मोदीजी विविध विषयांवर भाष्य करतात. यात अगदी कोणताही विषय वर्ज्य नसतो. देशभरातील विविध क्षेत्रांमधील गुणवंतांचे ते कौतुक करतात, अनेक विषयांबाबत मार्गदर्शन करतात, बर्याच विषयांचे गार्ंभीय उलगडून सांगतात. आणि हो, या सोबत ते समाजाच्या विविध वयोगटातील आबालवृध्दांना अचूक टिप्स देखील देतात. या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्याच्या मन की बात कार्यक्रमात नेमके कोणते मुद्दे असतील ? याची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.
Leave a Reply