बंगळुरू-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केले.
भारतीय सैन्य दलात नव्याने दाखल झालेल्या तेजस या फायटर जेटची स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफर केली. मोदी बंगळुरूच्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमटेड (HAL) येथे पोहोचले होते. येथील मॅन्युफॅक्चरींग हबची त्यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे मोदींनी तेजस लढाऊ विमानातून उड्डाणही भरलं.
मोदींनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना, हा अनुभव अविश्वसनीय असा होता. या उड्डाणामुळे आपल्या देशातील स्वदेशी उत्पादनाच्या ताकदीवरील माझा विश्वास आणखी बळावला आहे. देशाच्या राष्ट्रीय क्षमतेचा आणि ताकदीचा मला अभिमान वाटत असून नवीन आशावादही निर्माण झाला आहे. संपूर्ण देशवासियांचे अभिनंदन… असे म्हणत मोदींनी तेजस जेट उड्डाणानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. तर, डीआरडीओ, वायूदल आणि देशवासीयांचे अभिनंदन केले.
तेजस हे युद्धात शत्रुवर जोरकसपणे तुटून पडणारं फायटर जेट आहे. वायूसेनेच्या लढाऊ विमानांमधील अत्याधुनिक जेट असलेल्या फायटरची सफर अनुभवत मोदींनी आनंद व्यक्त केला. आपल्या जवानांसाठी असलेलं लढाऊ विमान स्वत: मोदीजींनी चालवून पाहिलं.
पीएम मोदी बंगळुरूच्या येलाहंका एअरबेसवर पोहोचले होते, जिथे त्यांनी स्वदेशी लढाऊ विमान तेजसने उड्डाण केले. तेजस हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केले आहे. हे सिंगल इंजिन हलके लढाऊ विमान आहे. त्याच्या दोन स्क्वॉड्रनचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे.
मोदीजींनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना, हा अनुभव अविश्वसनीय असा होता. या उड्डाणामुळे आपल्या देशातील स्वदेशी उत्पादनाच्या ताकदीवरील माझा विश्वास आणखी बळावला आहे. देशाच्या राष्ट्रीय क्षमतेचा आणि ताकदीचा मला अभिमान वाटत असून नवीन आशावादही निर्माण झाला आहे. संपूर्ण देशवासियांचे अभिनंदन… असे म्हणत मोदींनी तेजस जेट उड्डाणानंतर भावना व्यक्त केल्या

Leave a Reply