एकनाथ खडसेंचे डोके फिरलयं : गिरीशभाऊंची घणाघाती टिका

भुसावळ-प्रतिनिधी | एकनाथ खडसे यांचे डोके फिरले असल्याने ते काहीही बडबड करत आहेत अशा शब्दांमध्ये ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. ते भुसावळात बोलत होते.

भुसावळ येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमानंतर ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, खडसेंचे डोके फिरले आहेत. डोक्यावर परिणाम झालेला आहे. आता ते स्वतः अडचणीत आहेत. त्यांना दुसरे काहीही सुचत नाही. कमरेखालच्या भाषेत बोलत नाही. न बोललेलेच बरे. आता कागदोपत्री जे होईल त्याला त्यांनी सामोरे जावे.

संजय राऊतांवर बोलताना भिरीशभाऊ महाजन म्हणाले की, राऊत यांना उपचार करण्याची गरज आहे. ते सध्या काहीही बोलतात. आमच्याकडे २१० च्या वर आमदार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे बोटावर मोजणे इतके आमदार आहेत. तर राष्ट्रवादीकडे आठ ते दहा आमदार आहेत. त्यांच्याकडे राहिले तरी काय तरी पण ते इतकी हिंमत व धाडस या ठिकाणी करतात. राऊत हे वाचाळवीर आहेत. ते प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी काही बोलतात.

दरम्यान, गिरीशभाऊ महाजन यांनी पुढे सांगितले की, आम्हाला महाविजय संकल्प या दौर्‍यातून ३२५ जागा जिंकायचे आहेत. राज्यात ४५ प्लस म्हणजे शंभर टक्के निकाल लावायचा आहे. पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना विराजमान करायचे आहे. देशाला सुपरपॉवर बनवायचे आहे. देशाला महासत्ता बनवायचे आहे.रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळेस साडेतीन लाखाचा लीड घेतला होता. यावेळेस चार लाखाचा लीड घ्यायचा आहे. तर जळगाव लोकसभेत चार लाखाचा लीड मिळवला होता. यावेळेस तो साडेचार ते पाच लाखाचा लीड घेऊन दोन्ही लोकसभा जागांवर विजय मिळवायचा आहे, असा निर्धार देखील गिरीशभाऊंनी व्यक्त केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*