विष्णूदेव साय यांचा उद्या शपथविधी

रायपूर-वृत्तसेवा | विष्णुदेव साय उद्या अर्थात १३ डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

बुधवारी राजधानी रायपूरमध्ये शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव आणि छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीपक बैज यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

२१ ङ्गेब्रुवारी १९६४ रोजी जन्म झालेले विष्णुदेव साय यांचे मूळ गाव छत्तीसगडच्या कुंकुरी भागातील बगिया हे आहे. १९८९ मध्ये त्यांनी बगिया गावातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. १९९० मध्ये ते सरपंचपदी बिनविरोध निवडून आले होते. तापकरा विधानसभा मतदारसंघातून प्रथम आमदार झाले. छत्तीसगड स्वतंत्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी १९९० ते १९९८ या कालावधीत मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य देखील ते होते. आता त्यांना थेट छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*