विरोधकांचा ‘व्होट जिहाद’चा डाव जनतेने उधळून लावला : देवेंद्र फडणवीस

शिर्डी-प्रतिनिधी । विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादच्या माध्यमातून यश संपादन केले तरी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा व्होट जिहादचा डाव जनतेने उधळून लावला अश्या शब्दात मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते शिर्डी येथील राज्य अधिवेशनात बोलत होते.

शिर्डीतील ऐतिहासिक भाजप महाअधिवेशनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत “व्होट जिहाद” आणि राज्यातील अराजकतावादी हालचालींवर भाष्य केले. ते म्हणले की, “विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्राच्या जनतेने हा कट उद्ध्वस्त करत भाजपला ऐतिहासिक यश मिळवून दिले. फडणवीसांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत साईबाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या मंत्राला भाजपच्या तत्त्वांशी जोडले.

शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय भाजप महाअधिवेशनाने पक्षाच्या भविष्यासाठी नवीन दिशा दाखवली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माझ्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे की भाजपचे महाअधिवेशन साईबाबांच्या पवित्र भूमीत पार पडत आहे. साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र पक्षासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
या महाअधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व भाजप नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी महाराष्ट्रातील भाजपच्या तिसऱ्या हॅटट्रिक विजयाबाबत बोलताना सांगितले की, “महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजप हा असा पक्ष आहे, ज्याला तीनदा १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. महायुतीने यावेळी ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. भाजपने फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातही आपले मजबूत नेतृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही भाजपला पुन्हा पाठिंबा देत राज्याच्या प्रगतीसाठी महायुतीवर विश्वास दाखवला आहे. “विरोधकांनी निवडणुकीत व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्राच्या जागरूक जनतेने त्यांचे डावपेच ओळखले आणि महायुतीला पाठिंबा दिला.”

मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करत त्यांना भविष्यातील संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्राच्या जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास हा मोठा विजय आहे. पण आपल्याला या विश्वासाला कायम राखायचे आहे. हे यश फक्त सुरुवात आहे. पुढे अधिक कठोर मेहनत घेऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*