नवी दिल्ली- वृत्तसेवा । भारत मंडपम येथे भारत सरकार युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय मार्फत “स्वामी विवेकानंद जयंती” तथा “राष्ट्रीय युवा दिन” निमित्त ३ दिवशीय “विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात शेवटच्या व समारोप दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सदर कार्यक्रमात देशभरातून आलेल्या हजारो तरुणांशी संवाद साधला. तसेच विकसित भारत घडवण्यासाठी तरुणांच्या नवनवीन कल्पनाही त्यांनी ऐकल्या. यावेळी युवक कल्याण व क्रीडा मंत्री मनसुख मांडविया जी व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख उपस्थितीत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाने युवकांना मार्गदर्शन करून नवी दिशा आणि प्रेरणा दिली आहे. ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदजींनी यांनी तरुणांना जागृत करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे या कार्यक्रमाने विकसित भारताची घौडदौड हाती घेण्याचे काम घेतले आहे. त्यांनी विश्वास दाखवला आहे की आपले तरुण आजपासून 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याची शपथ घेतील आणि या शब्दांना पूर्ण अर्थ देतील.
सदर “विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग” या तीन दिवशीय कार्यक्रमात देशभरातून आलेल्या युवकांनी आपापल्या सांस्कृतिक कला, त्यांच्यातील क्षमतांचे यावेळी प्रदर्शन केले. तसेच देशभरातील विविध क्षेत्रातील महाशयांनी सदर युवकांना मार्गदर्शन करून विकसित भारत घडविण्यासाठी प्रेरणा दिल्या.
Leave a Reply