प्रयागराज– येथील पवित्र त्रिवेणी संगमात महाकुंभाच्या निमित्ताने भक्ती, आस्था आणि अध्यात्माचा महासंगम पहायला मिळाला. लाखो श्रद्धाळूंनी गंगेच्या तीरावर डुबकी लावून आपली आस्था व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पवित्र प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि महाकुंभाचे काही अविस्मरणीय क्षण सोशल मीडियावर शेअर केले.
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, लाखो भाविकांनी प्रयागराज महाकुंभात गंगेत स्नान करून आपली श्रद्धा व्यक्त केली. त्रिवेणी संगमचा परिसर ‘जय श्री राम’, ‘हर हर गंगे’ आणि ‘बम बम भोले’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोशल मीडियावर महाकुंभाचे काही फोटो शेअर केले आणि त्याला भक्ती आणि अध्यात्माचा एक अद्भुत संगम म्हटले.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या ऐतिहासिक प्रसंगी भाविकांचे स्वागत केले. ते म्हणाले की महाकुंभ हा आपल्या शाश्वत संस्कृतीचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. संगमात स्नान करून पुण्य मिळवणाऱ्या सर्व भक्तांचे त्यांनी अभिनंदन केले आणि ते श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक असल्याचे म्हटले.
महाकुंभ 2025 चा पहिला अमृत स्नान हा केवळ धार्मिक सोहळा नव्हे, तर आस्था, भक्ती आणि संस्कृतीचा अद्भुत संगम होता. लाखो भाविकांच्या सहभागाने हा महोत्सव ऐतिहासिक बनला. पवित्र गंगेत स्नान करण्याचा अनुभव, गंगा आरतीचे आल्हाददायक दृश्य, आणि मकर संक्रांतीचे आध्यात्मिक महत्त्व यामुळे महाकुंभ 2025 ने भारताच्या सांस्कृतिक वारशाला नवसंजीवनी दिली.
Leave a Reply