भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी चंद्रशेखर अग्रवाल !

भुसावळ-प्रतिनिधी | येथील भाजपचे कट्टर कार्यकर्ते चंद्रशेखर उर्फ मोंटू अग्रवाल यांची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रशेखर अग्रवाल यांची भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी प्रदान केले आहे.

चंद्रशेखर अग्रवाल यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*