शिर्डी प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी माजी मंत्री आ. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्रीपद हे महत्वाचे खाते मिळाले आहे. तर मंत्रीमंडळातून माजी सार्वजनीक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मध्यंतरी प्रदेशच्या संघटनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यानंतर आता त्यांना प्रदेश कार्यकारी अध्यक्षपद मिळाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही नियुक्ती केली असून भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी नियुक्तीचे पत्रक जारी केले आहे.
आज शिर्डी येथे भाजपचे राज्य अधिवेशन होत असून याच्या पूर्वसंध्येला रवींद्र चव्हाण यांच्याकडे कार्यकारी प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत प्रदेशाध्यक्षपद राहणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. तर, आशीष शेलार यांच्याकडे देखील मुंबईचे अध्यक्षपद कायम ठेवण्यात आलेले आहे.
Leave a Reply