भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

जयपुर-वृत्तसेवा | भजनलाल शर्मा हे आता राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.

राजधानी जयपूर इथं राजस्थान भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत सुरुवातीला माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याच नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु होती. पण अचानक त्यांचं नाव या शर्यतीतून मागे पडलं आणि भाजप आमदार भजनलाल शर्मा यांचं नाव पुढे आलं. त्यानंतर स्वतः वसुंधराराजे यांनीच राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, यासोबतच दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे उपमुख्यमंत्री असतील. तर वासुदेव देवनानी विधानसभा अध्यक्ष असतील. भजनलाल शर्मा हे जयपूरच्या सांगानेर मतदारसंघाचे आमदार आहेत. दिया कुमारी जयपूरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत, तर प्रेमचंद बैरवा जयपूर जिल्ह्यातील दुडू मतदारसंघातून आमदार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*