प्रदेशाध्यक्षांच्या भुसावळातील कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

भुसावळ- प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आयोजीत कार्यक्रमाला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला.

भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील सिंधी कॉलनीतील बडा सेवा मंडळात गुरुवारी सायंकाळी त्यांनी सुपर्स वॉरीयर्सशी संवाद साधला तसेच भुसावळ, चोपडा व रावेर विधानसभा मतदारसंघाबाबत बैठकही घेतली. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत घर-घर चलो अभियान व २५० मीटरची रॅली काढण्यात आली. अग्रभागी भजनी मंडळ, डीजेचा ताल व भगव्या फेटेदारी महिलांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींचा जयघोष केल्याने परिसरात भाजपमय वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर २०२४ साठी महाविजय रॅली तसेच घर-घर चलो अभियान अंतर्गत बावनकुळे यांनी रवी फॅन्सिंगवाले यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बावनकुळे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले तसेच विविध समाजाच्या शिष्टमंडळांतर्फे त्यांना निवेदन देवून पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शवण्यात आला.

सिंधी कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या कॉर्नर सभेत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची मूर्ती मंदिरात विराजमान होत असून या दिवशी देशातील सर्वात मोठी दिवाळी साजरी होईल. प्रत्येक हिंदू बांधवांनी यावेळी घरात या दिवशी दिवा लावावा, असे आवाहन त्यांनी केले. तब्बल ५२७ वर्षांनी हा योग जुळून आल्याचे ते म्हणाले. पुढील महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळात सभा होणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.पाच हजार रामभक्तांना दर्शन घडवा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करीत असताना आमदार संजय सावकारे यांना जवळ बोलावून प्रभू श्रीरामांचा जयघोष करीत उपस्थितांना अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी यायचे का ? म्हणून विचारणा केली असता सर्वांनीच होकार दर्शवल्यानंतर २२ जानेवारी २०२४ ते २२ सप्टेंबदरम्यानच्या काळात पाच हजार रामभक्तांना अयोध्येत दर्शन घडवण्याची जवाबदारी आमदार संजय सावकारे यांच्यावर सोपवली व आमदारांनीदेखील तत्काळ त्यास होकार दिला. तातडीने त्यासाठी पदाधिकार्‍यांनी नोंदणी करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगरसेवक युवराज लोणारी, बापू महाजन, ऍड.बोधराज चौधरी, रमेश नागराणी, राजेंद्र आवटे, किरण कोलते, पिंटू ठाकूर, प्रमोद नेमाडे, अजय नागराणी, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, रमाशंकर दुबे, शिशिर जावळे, सुमित बर्‍हाटे, सामाजिक कार्यकर्ता प्रमोद सावकारे, देवा वाणी, विशाल जंगले, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*