पंतप्रधान मोदी यांनी केले सूरत येथील डायमंड बाजाराचे लोकार्पण

सूरत-वृत्तसेवा | जगातील सर्वात मोठा डायमंड बाजार असणार्‍या सूरत डायमंड बोर्स या बाजाराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १७ डिसेंबर रोजी गुजरातमध्ये बांधलेल्या सुरत डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन केले. पेंटागान या यूएस डिफेन्स हेडक्वार्टर पेक्षा ही सर्वात मोठी एकमेकांशी जोडलेली आणि ऑफिसची इमारत आहे. त्याची ४५०० हून अधिक कार्यालये आहेत. सदर डायमंड बाजार ३,५०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू झाले. त्याचे काम एप्रिल २०२२ मध्ये पूर्ण झाले.

प्रारंभी तत्पूर्वी, पीएम मोदींनी सुरत विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनलचे उद्घाटन केले आणि यानंतर रोड शो देखील केला.

सुरतमध्ये बांधलेल्या या मेगास्ट्रक्चरमध्ये ९ ग्राउंड टॉवर आणि १५ मजले आहेत. यामध्ये ३०० चौरस फूट ते १ लाख चौरस फुटांपर्यंतच्या ४,५०० हून अधिक कार्यालयीन जागा आहेत. या बाजारात डायमंड विक्रेत्यांसह सेफ डिपॉझिट व्हॉल्ट, कॉन्फरन्स हॉल, मल्टीपर्पज हॉल, रेस्टॉरंट्स, बँका, कस्टम क्लिअरन्स हाऊस, कन्व्हेन्शन सेंटर, प्रदर्शन केंद्र, प्रशिक्षण केंद्र, मनोरंजन क्षेत्र आणि क्लब यासारख्या सुविधा आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*