
नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची धोरणे तसेच निर्णयांमुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली असून त्यांना नोबेल शांतता पुरस्कार द्यायला हवा, अशी मागणी दिग्गज गुंतवणूक तज्ज्ञ मार्क मोबियस यांनी केली आहे.
८६ वर्षांचे दिग्गज गुंतवणूकदार मोबियस यांनी मुलाखतीमध्ये मोदींच्या कार्यांची प्रशंसा केली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात अशांतता आहे. या काळात पंतप्रधान मोदी शांतीदूत ठरु शकतात, असे भाकित त्यांनी केले. मोबीयस यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान मोदी एक महान नेता आणि चांगले व्यक्ती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे महत्त्व वेगाने वाढत आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकाराच्या राजकीय व्यक्तींशी चर्चा करण्याची क्षमता आहे.
आगामी काळात पंतप्रधान मोदी महत्त्वाचे शांतीदूत ठरु शकतात. नोबेल शांतता पुरस्काराबाबत बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी या प्रतिष्ठेच्या जागतिक पुरस्काराचे दावेदार आहे. भारताकडे सर्व देशांमध्ये अलिप्त देश म्हणून राहण्याची क्षमता आहे. भारताची ही क्षमता त्यांना जागतिक स्तरावरील शांततेसाठी मध्यस्थ बनण्यात उपयोगी ठरु शकते. संपूर्ण जगात मध्यस्थीची भूमिका बजावण्यासाठी मोदी महत्त्वाचे व्यक्ती आहेत.
Leave a Reply