धरणगावात बूथ सशक्तीकरण बैठक

धरणगाव-प्रतिनिधी | तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख,सुपर वारीयर्स व प्रमुख पदाधिकारी यांची संघटात्मक बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

आगामी निवडणुका लक्षात घेता “बुथ जिता चुनाव जिता” यासाठी मेरा बुथ सबसे मजबुत करण्यासाठी बुथ वरील करणीय कार्य या विषयावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले सदर बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर, बुथ जिल्हा संयोजक रोहितदादा निकम,जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हाउपाध्यक्ष अँड.संजय भाऊ महाजन,माधुरी ताई अत्तरदे,यांनी मार्गदर्शन केले.व्यासपीठावर कृ.उ.बाजार समितीचे उपसभापती संजय पवार,जिल्हा चिटणीस प्रमिला ताई रोकडे,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,महिला तालुकाध्यक्ष रेखाताई पाटील,यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास माळी सर यांनी केले. प्रास्ताविक जिजाबराव पाटील यांनी तर आभार सचिन पाटील यांनी मानले. बैठकीची प्रसिद्धी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख टोनी महाजन केली. सदर बैठकीत धरणगाव तालुक्यातील सर्व बुथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख,सुपर वारीयर्स व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*