
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीला कौल मिळाला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीला फटका बसू शकतो, असं बोललं जातंय. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेनुसार महाविकास आघाडी महायुतीला मागे टाकू शकते. राज्यात एनडीए आघाडीला 19-21 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडीला 26-28 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यावर फडणवीसांनी मत व्यक्त केलं.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ए व्होटर असो, बी व्होटर असो, सी असो की झेड व्होटर असो.. मी सगळ्या सर्व्हेंचा सन्मान करतो. मात्र देशात फक्त मोदीजींची हवा आहे. जनतेने ठरवलंय, मोदीजींनाच मत द्यायचं. त्यामुळे आम्ही लोकसभेत आम्ही ४०च्या पुढे जागा जिंकणार आहोत.
सर्व्हेनुसार राज्यातील मतांची टक्केवारी पाहिली तर इंडिया आघाडीला 41 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर एनडीएला 37 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या सर्व्हेवरुन अनेक पक्षांचे नेते प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.
Leave a Reply