नवी दिल्ली-वृत्तसंस्था | विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नऊ भाजपा सदस्यांनी दिलेले लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामे स्वीकारण्यात आले असल्याची घोषणा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केली.
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने काही केंद्रीय मंत्री तसेच संसद सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यात राजस्थानमधून विजयी झालेले बाबा बालकनाथ यांनीही गुरुवारी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजस्थानच्या जयपूर ग्रामीणमधून विजयी झालेले राज्यवर्धन राठोड, महासमंदमधून विजयी झालेल्या राजकुमारी दियाकुमारी, मध्यप्रदेशच्या मुरैनामधून विजयी झालेले केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, दमोहमधून विजयी झालेले केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, सिधी येथून विजयी झालेल्या रिती पाठक, जबलपूरमधून विजयी झालेले राकेशसिंह, होशंगाबादमधून विजयी झालेले उदयप्रतापसिंह, छत्तीसगडच्या रायगडहून विजयी गोमती साय तसेच बिलासपूरचे खासदार अरुण साव यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
या नऊ जणांचे राजीनामे ६ डिसेंबरलाच मंजूर करण्यात आले, असे बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर जाहीर केले. बुधवारी भाजपाच्या दहा खासदारांनी राजीनामे दिले होते. यापैकी नऊ सदस्य लोकसभेचे तर किरोडीमल मिणा हे राज्यसभेचे सदस्य आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भाजपाने चार राज्यातील निवडणुकीत २१ खासदारांना उमेदवारी दिली होती. यापैकी १२ खासदार विजयी झाले. त्यातील दहा जणांनी राजीनामे दिले होते. तर, केंद्रीय मंत्री ङ्गग्गनसिंह कुलस्ते यांच्यासह भाजपाच्या नऊ खासदारांचा या निवडणुकीत पराभव झाला

Leave a Reply