
नवी दिल्ली- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी उत्तराखंड ग्लोबल इंवेस्टर्स समिटचे उदघाटन करतांना देशातील तरुणांनी वेड इन इंडिया मूव्हमेंट चालविण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आधी मन की बातमध्ये डेस्टीनेश वेडींगवर पैसे खर्च न करण्याचे आवाहन केले होते. यानंतर त्यांनी उत्तराखंडातील कार्यक्रमात वेड इन इंडियाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. दरम्यान, ते पुढे म्हणाले की, देवभूमी उत्तराखंड येथे येऊन मनाला शांती मिळते, मन प्रसन्न होते. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी येथे आलो होतो. त्यावेळी, माझ्या तोंडून हे शब्द अचानकपणे बाहेर पडले होते, २१ वे शतकातील हे तिसरं दशक उत्तराखंडचे आहे. आता, मी केलेल्या त्या विधानाकडे गांभीर्याने आणि ध्येय भावनाने पाहत आहे, असे मोदींनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच उत्तराखंड येथील धार्मिक प्रार्थनास्थळांना भेटी देतात. भारतीय संस्कृती आणि सौंदर्य पाहण्यासाठी आज देशातील आणि विदेशातील नागरिकही मोठ्या प्रमाणात भारतात पर्यटन करत आहेत. लोकांमध्ये भारत दर्शनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. म्हणूनच, आम्ही थीम बेस्ड पर्यटनाची योजना आखत आहोत. भारताचे निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांची जगाला माहिती व्हायला पाहिजे. त्यामध्ये, उत्तराखंड टुरिझम सर्वात प्रभावी ब्रँड बनले, असेही मोदींनी म्हटले.
नरेंद्र मोदींनी येथील लोकांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाचाही उल्लेख केला. जनतेने स्थीर आणि मजबूत सरकार निवडून दिले आहे. लोकांनी गव्हर्नेंसच्या ट्रॅक रेकॉर्डवरच मतदान केले आहे. डबल इंजिन सरकारमुळे डबल गतीने विकास केला जात आहे असे मोदींनी म्हटले.
Leave a Reply