जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे महायुतीचे उमेदवार मंत्री गिरीश महाजन यांनी मोठ्या फरकाच्या मताधिक्याने विजय मिळवून दिलीप खोडपे यांचा पराभूत केले आहे. मंत्री गिरीश महाजन हे 26 हजार 885च्या फरकाने ते विजयी झाले आहेत. त्यांना १ लाख २८ हजार ६६७ मते मिळवून विजयी झाले आहे. विक्रमी सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
जळगाव ग्रामीण विधानसभेच्या निवडणुकीत प्रमुख दोन मातब्बर नेते मंत्री गिरीश महाजन आणि दिलीप खोडपे यांच्यासह इतर पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांनी प्रचार सभेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेच्या झालेल्या मतमोजणीत मंत्री गिरीश महाजन यांनी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या २५व्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. तर त्यांनी विरोधात असलेल्या सर्व उमेदवारांचा सुपडा साफ करत मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. यात गिरीश महाजन यांना १ लाख १२ हजार ६६७ तर महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांना १ लाख १७ हजार ७८२ मते मिळाली. सकाळपासून सुरू असलेल्या या मतमोजणीत दुपारी ४ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हात येऊन मंत्री गिरीश महाजन हे विजय झाल्याचे घोषित करण्यात आले.
Leave a Reply