
जळगाव-प्रतिनिधी | आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांनी जळगावातील रस्त्यांसाठी तब्बल ४० कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्प अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जळगाव शहराच्या मुख्य रस्त्यांच्या शहरातील मुख्य रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४० कोटींचा निधी आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांना यश रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झालेला निधीमंजूर झालेल्या कामांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
या निधीच्या माध्यमातून पिप्राळा ते सावखेडा ८.५ ५कोटी, मोहाडी रस्ता-६ कोटी, नेरी नाका ते झाशीची राणी पुतळा ३ कोटी, झाशीची राणी पुतळा ते टॉवर ३ कोटी, गिरणा पंपिंग रस्ता १.५ कोटी,हायवे समांतर रस्ता (खोटे नगर ते बांबोरी ब्रिज)३ कोटी, हायवे समांतर रस्ता (अजिंठा चौङ्गुली ते खेडी) ३ कोटी, हायवे समांतर रस्ता (बेंडाळे स्टॉप ते खोटे नगर) ३ कोटी, शिवाजीनगर ते ममुराबाद रस्त्याला जोडणारा मार्ग ६ कोटी, शिवाजीनगर पोलीस चौकी ते जुने हुडकोवर तीन कोटी या कामांसाठी खर्चाचा समावेश आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तसेच मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या सगळ्यांच्या सहकार्यातून हा निधी मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार राजूमामा भोळे यांनी दिली आहे.
Leave a Reply