जळगाव-प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. यात गिरीश भाऊ महाजन यांना नेमकी कोणती मोठी जबाबदारी मिळणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. उद्या सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. यात मुख्यमंत्री पदावर अद्याप देखील एकमत झाले नसले तरी मंत्रिमंडळात नेमके कुणाला स्थान मिळेल याची यादी तिन्ही घटक पक्षांच्या वरिष्ठांनी तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून समजले जाणारे गिरीश भाऊ महाजन यांना देखील मोठे खाते मिळू शकते असे संकेत मिळाले आहेत. यापूर्वी त्यांनी जलसंपदा तसेच ग्राम विकास हे दोन महत्त्वाचे खाते अतिशय समर्थपणे सांभाळलेले आहेत. आता याच्याच तोलामोलाचे किंवा यापेक्षा महत्त्वाचे खाते त्यांना मिळणार का ? याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे.
गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला उत्तर महाराष्ट्रात अतिशय दणदणीत असे यश मिळालेले आहे. येथून महाविकास आघाडीचे अक्षरश: सुपडे साफ झाले असून याचे श्रेय गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाला दिले जात आहे. त्यांनी आपली जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पडली असल्यामुळे आता त्यांना मोठे खाते निश्चितपणे मिळणार असे मानले जात आहे यामुळे सर्वांचेच लक्ष उद्याच्या शपथविधीकडे लागलेले आहे.
Leave a Reply