खा. उन्मेष पाटील यांच्या उपस्थिती विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या रथाचा शुभारंभ

चाळीसगाव-प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव येथे खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या रथाचा आज शुभारंभ करण्यात आला.

भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.१५ नोव्हेंबर २०२३ ते दि.२६ जानेवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या जळगांव जिल्ह्यात फिरणार्‍या रथापैकी आज पिंपळगाव ता. चाळीसगाव येथील रथाचा शुभारंभ करण्यात आला. विविध योजनांच्या माध्यमातून एक तरी लाभ आपणास मिळावा यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे. या लाभातून आपण आत्मनिर्भर होणार असून यातून देश आणि देशवासी विकसित होणार असल्याचा मनोदय घेऊन ही संकल्प यात्रा आपल्या दारापर्यंत येणार असल्याचा आनंद असल्याची भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आज दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स मार्गदर्शनाचा लाभ उपस्थीतांनी घेतला. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते सरपंच जिजाबाई भिल्ल,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,माजी सभापती दिनेश बोरसे, उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सरपंच संतोष देशमुख आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृतीसाठी हा रथ रवाना करण्यात आला.

खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारत सरकार च्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल-मे २०१८ या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान तसेच माहे जुन-ऑगस्ट २०१८ या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले असून, अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उददेशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून आज पिंपळगाव ता. चाळीसगाव येथून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून एल ई डी माहितीपट असलेला रथ तालुक्यात फिरणार असून श्रीफळ वाढवून रथाचे पूजन केले. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक सरपंच संतोष देशमुख तर सूत्रसंचालन व आभार गोरख राठोड यांनी मानले.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती दिनेश बोरसे,उपसभापती भाऊसाहेब पाटील, सरपंच जिजाबाई भिल्ल ,विकासो चेअरमन राजाराम काकडे, माजी सरपंच संतोषभाऊ देशमुख, ज्येष्ठ नागरिक बापूराव देशमुख, गण प्रमूख महेश शिदे, माजी चेअरमन भूषण देशमुख,पंचायत समिती माजी सदस्य रवी चौधरी, अनुसूचित जाती जमाती आघाडीचे ज्ञानेश्वरभाऊ बागुल, करजगावचे माजी सरपंच नारायण पाटील, तळेगावची माजी सरपंच संतोष राठोड, ग्रामपंचायत सदस्य धनंजय देशमुख, भिकन देवकर, ओबीसी जिल्हा पदाधिकारी निलेशभाऊ पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चेतन देशमुख, हरिभाऊ कोते,माजी सरपंच शिंदी सुरेश गजे, डॉ.संदीप चव्हाण,माजी सरपंच गोरख राठोड, कृष्ण नगर उपसरपंच मनोज चव्हाण, विस्तार अधिकारी आर. आय. पाटील, पोलीस पाटील अनिल शेलार, घोडेगाव सरपंच उखाभाऊ सोनवणे,रोहिणी उपसरपंच राजभाऊ वाघ, वाल्मीक नागरे हातगाव चे माजी सरपंच दत्ता नागरे, सागर मुंडे, जगन्नाथ आवटे, समाधान आव्हाड, विकास बोंडारे,संजय राठोड, प्रकाश चव्हाण,भाऊसाहेब नवले,अंकुश राठोड, समाधान राठोड, बबलू चव्हाण, लक्ष्मण राठोड, समाधान राठोड, तळेगाव बूथ प्रमुख महेश शिंदे,वाल्मीक नागरे,शिवाजी राठोड, नंदूभाऊ नागरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख राठोड यांनी तर प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी केले नंदकुमार वाळेकर, दिनेश बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला बंधू भगिनी ग्रामस्थ,आशा सेविका,अंगणवाडी सेविका आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते भारत आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले. सरपंच जिजाबाई भिल्ल यांनी पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गरजू महिलेला उज्वला गॅस योजनेचे कनेक्शन देऊन योजनेचा लाभ वितरीत करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*