
जळगाव- प्रतिनिधी । महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर, मुंबईचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ‘अध्यक्षांशी संवाद’ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स जळगाव कार्यालयाने आयोजित केला होता. कार्यक्रमाला जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांत पुढाकार घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील निर्यातदारांना ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजन’ सेवेचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकप्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून आलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी बांधील आहे व त्यासाठी केंद्रशासन आपल्या सोबतीला राहील. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास साठी केलेल्या प्रयत्नाबद्दल मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई व जळगाव कार्यालयाचे कामाचे कौतुक करतो असे गौरव उद्गार त्यांनी काढले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील उद्योजक व व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी व समस्यांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा असून नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे बोलून दाखविले. तसेच उद्योजकांच्या व व्यापाऱ्यांच्या सकारात्मकतेवर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अवलंबून असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
Leave a Reply