उद्धव ठाकरे यांना राम नामाची अॅलर्जी – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई-प्रतिनिधी | शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना काँग्रेससारखीच रामनामाची अॅलर्जी झाल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रचारात धर्म व देवाच्या नावाने मते मागितली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यासंबंधी निवडणूक आयोगाला एक पत्रही लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी झाली आहे. रामनामाचा आणि रामभक्तांचा भाजपला अभिमान आहे. तुम्हाला मात्र आता रामनामाचा गजर केला की त्रास होतोय. काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा तिरस्कार करत आहात. तुम्ही कितीही विरोध केला तरी करोडो रामभक्त आयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतील. जय श्रीराम!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*