चाळीसगाव- प्रतिनिधी | आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी तब्बल ९४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
चाळीसगाव महायुतीच्या नेतृत्वाखालील सरकारचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन आज दि.७ पासून नागपूर येथे सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ९४ कोटींचा भरघोस निधी मंजूर करण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले आहे.
त्यात वलठान येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा जीर्ण इमारतीजवळ नवीन जी+२ भव्य इमारत (१३ कोटी २६ लक्ष) व आदिवासी मुलींचे वस्तीगृह (१४ कोटी ५० लक्ष), तालुक्यातील विविध महत्वाचे रस्ते व पूल (५६ कोटी), २६ नवीन तलाठी कार्यालये (३ कोटी ९० लक्ष), ट्रामा केअर सेंटर येथे शस्त्रक्रिया गृह (जढ) व मोड्युलर अतिदक्षता विभाग (खउण) बांधकाम करणे (३ कोटी ३६ लक्ष), कॉमन पूल टाईप ची २ शासकीय निवासस्थाने बांधकाम करणे (३ कोटी ६३ लक्ष) अश्या कामांचा समावेश आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव मतदारसंघात भाजपा महायुती सरकार स्थापन झाल्यांनतर दीडच वर्षात शेकडो कोटींचा निधी मंजूर झाला आहे, त्यात या निधीची भर पडल्याने विकासकामांना अधिक गती मिळणार आहे. सदर निधी मंजूर केल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार, ग्रामविकासमंत्री गिरीशभाऊ महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
Leave a Reply